पुढील आठवड्यापासून मान्सून परतण्याची शक्यता

नवी दिल्ली : दक्षिण पश्‍चिम मान्सून पुढच्या आठवड्यापासून पश्‍चिमी राजस्थानमधून परतण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, पुढच्या एक दोन दिवसात मान्सून परतण्याची अवस्था अनुकुल होईल. उत्तर भारताच्या मैदांनांमध्ये तापमान सामान्यपेक्षा अधिक गरम राहिल.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, ही स्थिती त्या हवामाना पैकी एक आहे, जी मान्सून परतण्यासाठी अनुकुल आहे. अंदाज आहे की, 20 सप्टेंबर पासून पश्‍चिमी राजस्थान मध्ये मान्सून चा पाऊस होणार नाही. विभागाने यावर्षी मान्सून परतण्याच्या तारखेत बदल झाल्याचे सांगितले आहे. यावेळी 17 सप्टेंबर पासून मान्सूनचे परतणे सुरु झाले.

बंगाल च्या खाडीमध्ये कमी दबाव क्षेत्र तयार झाल्याने यामध्ये विलंबाची शक्यता आहे. पश्‍चिमी राजस्थान पासून मान्सून परतण्याबरोबरच थंड हवामान सुरु होते. येत्या एक-दोन दिवसांत मध्य आणि दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हवामान विभागाने शनिवारी महाराष्ट्र, केरळ, गोवा आणि कर्नाटकातील काही भागात ऑरेंज वार्निंग अलर्ट जारी केला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here