मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर महापालिकेचे लक्ष, कठोर निर्णय घेणार

मुंबई : एकीकडे देश आणि जगात हळूहळू कोरोना महामारीपासून सावरण्याचा प्रयत्न सुरू सताना महाराष्ट्रात स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोविड १९चे वाढत चालेल्या रुग्णसंख्येची पडताळणी केली जाईल असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. जर रुग्णसंखया वाढली आणि लोकांकडून कोविडसंबंधीच्या नियमांचे पालन झाले नाही, तर पुढील दहा दिवसांत महापालिकेकडून कठोर निर्णय घेतला जाईल असे काकानी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ६ फेब्रुवारीपासून १२ फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोना विषाणूचे नवे २०५९० रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी २० हजार २०० जण बरे झाले आहेत. त्यामुळे १६९ लोकांना आपला जीव गमवावा लागला. राज्यातील कोविड १९ च्या रुग्णांची साप्ताहिक संख्या २९४१ होती. बुधवारी १० फेब्रुवारी रोजी रोजच्या दैनंदिन संख्येत गतीने वाढ झाली. एकूण २ कोटी १ लाख लोकांपर्यंत रुग्णसंख्या पोहोचली. तर १० लाख ९७ हजार ४७५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील लॉकडाउन हळूहळू संपुष्टात आणल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे. राज्यातील शाळाही हळूहळू खुल्या केल्या जाऊ लागल्या आहेत.

भारताकडून कोरोना विरोधातील लढाईत शेजारील देशांनाही लस पाठविली जात आहे. भारताची ही व्हॅक्सिन डिप्लोमसी म्हटली जात आहे. रविवारी अफगाणीस्तानला पाठविलेली पहिल्या टप्प्यातील लस पोहोचली. भारताकडून अफगाणीस्तानला एक्ट्राजेनेका व्हॅक्सिनचे ५ लाख डोस पाठविण्यात आले आहेत. मात्र, याच्या आपत्कालीन वापरास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आरोग्य मंत्रालयाच्या लसीकरण अभियानाचे प्रमुख गुलाम दस्तगीर नाजरी यांनी सांगितले की ही लस काबूलमध्ये ठेवली जाईल. आतप्कालीन वापरास मंजूरीनंतर पुढील निर्णय घेतला जाईल. एका आठवड्यात मंजूरी मिळेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here