पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे; आयएमडीचा इशारा

50

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यांत पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितले.

दरम्यान १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीतच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात उत्तर पश्चिम भारताच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाच्या हालचाली वेगावतील. पुढील ती दिवस गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू शकतो. पुढील काळात उत्तर प्रदेशमध्ये अशाच स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here