पुढचे चार ते सहा महीने COVID-19 मुळे सर्वात वाईट असू शकतात: बिल गेट्स

126

नवी दिल्ली: माइक्रोसॉफ्ट चे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी इशारा दिला की, दुदैवाने पुढचे चार ते सहा महीने COVID-19 मुळे सर्वात वाईट असू शकतात. गेटस यांचे फाउंडेशन COVID-19 लस विकसीत करणे आणि वितरीत करण्याच्या प्रयत्नात महत्वाची भूमिका निभावत आहेत. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन चे सह-अध्यक्ष गेट्स यांनी सीएनएन ला सांगितले की, IHME (इंस्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एंड इवैल्यूएशन) चे पूर्वानुमान 200,000 पेक्षा अधिक अतिरिक्त मृत्यु दाखवतात, पण जर आपण नियमांचे पालन करु तर आपण अनेक लोकांचा जीव वाचवू शकतो. अलीकडेच, अमेरिका कोरोनाचे अधिक रुग्ण, मृत्यु याचा अनुभव घेत आहे. COVID-19 ने आतापर्यंत अमेरीकेत 290,000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे. गेटस यांनी सांगितले की, त्यांचे फाउंडेशन वैक्सीन साठी खूप रिसर्च करत आहे.

त्यांनी सांगितले की, आम्हाला जागतिक अर्थव्यवस्था पुढे वाढावी असे वाटते. आम्ही मृत्यु संख्या कमी करू इच्छीतो. अशा स्थितीत अंतर्राष्ट्रीय भागीदारी आणि सहकार्य महत्वाचे आहे. यासाठी सर्व लस / वैक्सीन ची क्षमता वाढवण्याची गरज आहे. वैक्सीन मध्ये लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी माजी अमेरिकी राष्ट्रपति, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आणि बराक ओबामा प्रमाणे वैक्सीन ला सार्वजनिक रूपात घेतील, जेणेकरून लोकांचा वैक्सीन वर विश्वास वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here