महाराष्ट्रात कोरोनाच्या सक्रीय रुग्णसंख्येत घट, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांचा दावा

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात स्थिती आता पूर्वपदावर येत आहे. महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण येत आहे. महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे ५२२५ नवे रुग्ण आढळले तर १५४ जणांचा मृत्यू झाला. अॅक्टिव्ह रुग्ण संख्येत झालेली घट ही दिलासादायक बाब ठरली आहे. बुधवारी महाराष्ट्रात ५८,०६९ रुग्ण होते. तर गुरुवारी ही संख्या ५७,५७९ इतरी होती. त्यापूर्वी मंगळवारी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ६२,०६९ इतकी होती.

महाराष्ट्रातील सहा ते सात जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यामध्ये पुणे, ठाणे, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अनुक्रमे १२९१७, ७०२० आणि ६७९२ इतके सक्रिय रुग्ण आहेत. राज्याचे सर्व्हिलान्स ऑफिसर डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, सक्रिय रुग्णसंख्येच्या घसरणीने विषाणूचा प्रभाव कमी झाल्याचे संकेत मिळाले आहेत. आम्ही प्रभावी पद्धतीने दुसऱ्या लाटेचे नियंत्रण केल्याचे यातून सिद्ध झाले. रुग्ण संख्या सहा लाखांपर्यंत पोहोचली होती. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात स्थिती अतिशय बिकट बनली होती. त्यावेळी कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ६ लाखांपर्यंत पोहोचली होती.
ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे. जे. हॉस्पिटलच्या वैद्यकीय विभागाचे प्रा. डॉ. विकार शेख यांनी सांगितले की, अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घसरण येत आहे. मात्र सध्याची स्थिती स्थिर नाही. ज्या पद्धतीने डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण मिळत आहेत, ते पाहता तिसरी लाट येऊ शकते अशी भीती आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here