कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 75 लाखाच्या पार, एका दिवसात आढळले 45,230 कोरोना रुग्ण

138

नवी दिल्ली: कोरोना च्या दैनंदिन रुग्णांमध्ये पुन्हा एक घट नोंदवण्यात आली आहे, ज्यामुळे कोरोना चा ग्राफ खाली जात आहे. रविवारी कोरोनाचे 46,963 रुग्ण समोर आले आहेत. तर गेंल्या 24 तासात 45,230 नवे रुग्ण समोर आले आहेत. देशामध्ये कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 75 लाखा वर गेली आहे. तर सक्रिय रुग्ण सहा लाखाच्याही खाली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या 24 तासात 45,230 कोरोनाग्रस्त समोर आले आहेत. देशामध्ये कोविड 19 मुळे संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 82,29,313 आहे.

आकड्यांनुसार, देशामध्ये 75,44,798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तसात 53,285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे आणि उपचारानंतर आता घरी आले आहेत. देशामध्ये सक्रिय रुग्ण आणि कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत जवळपास 70 लाखाचे अंतर आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here