आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.33 (2,19,33,43,651) कोटींची संख्या पार केली आहे.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,47,585) कोटीहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याची मोहीम देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.
भारतातील रुग्णसंख्या सध्या 26,834 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.06% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 1,841 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,75,149 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,060 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 1,10,863 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.86 (89,86,99,680) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.02% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.86% इतका आहे.