शेतकरी आणि श्रमिकांना भेंटले गोविंदनगर साखर कारखान्याचे मालक

140

वाल्टरगंज, उत्तर प्रदेश: गोविंदनगर साखर कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी कारखान्याचे नवे मालक कन्हैय्या लाल शर्मा आले होते . आसपासचे शेतकरी आणि कारखाना कर्मचार्‍यांना ही माहिती मिळाल्यावर ते मालकांना भेटण्यासाठी कारखान्यावर आले. कन्हैय्या लाल शर्मा यांनी कारखाना सुरु करणार असल्याचे सांगितल्यावर शेतकर्‍यांच्यात आनंदाची लहर पसरली. यानंतर कारखान्याच्या मालकांनी श्रमिक आणि शेतकर्‍यांशी चर्चा करुन कारखाना योग्य पद्धतीने सुरु होण्यासाठी सहकार्य मागितले. लवकरच थकबाकी भागवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

नव्या मालकांनी कारखाना परिसरामध्ये फिरुन कार्यालय, गोदाम आणि मशीनची पाहणी केली. सफाई करणे, विज पाण्याची व्यवस्था देण्याबाबत निर्देश एचआर चंद्रेश दुबे यांनी दिले. उपस्थित कर्मचार्‍यांनी थकबाकी भागवण्याची मागणी केली. नव्या कारखाना मालकांनी कर्मचार्‍यांना दिवाळीला आंशिक रुपात थकबाकी भागवण्याचे अश्‍वासन दिले. दरम्यान श्रमिकांनी नव्या मालकांचे स्वागत करुन त्यांना मिठाई भरवली. कर्मचार्‍यांनी त्यांना आश्‍वस्त केले की, कारखाना सुरु करण्यात ते पूर्ण ताकद लावतील. यावेळी चंद्रेश दुबे, आरसी पांड्ये, जिल्हा पंचायत सदस्य राम प्रकाश चौधरी, शेतकरी राम मनोहर चौधरी, विकास ठाकुर, कमलेश पटेल, राकेश राजभर, संजय चौरसिया, महेश पांड्ये, वीरेंद्र चौधरी, अंगद वर्मा, संतोष सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here