साखर कारखान्यामध्ये अपघात, तीन मजूर जखमी

आजमगढ, उत्तर प्रदेश: द किसान सहकारी साखर कारखाना साठियांव मध्ये सोमवारी बॉयलरच्या इएसपी च्या दुरुस्ती दरम्यान प्लॅटफॉर्म तुटल्यामुळे तिथे काम करणारे तीन मजूर जखमी झाले. 12 फुट उंचावर काम सुरु होते. वरुन पडल्यामुळे तीन मजूर जखमी झाले. उपचारा दरम्यान एका मजूराची स्थिती गंभीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला लखनउ मध्ये घेवून जाण्यास सांगितले. साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे कर्मचार्‍यांना धक्का बसला आहे.

साखर कारखाना साठियांव मध्ये पुढच्या गाळप हंगामाबाबत युद्ध पातळीवर साफ सफाई आणि दुरुस्तीचे काम सुरु आहे. साखर कारखाना सुरु करण्याचा ठेका जैक कंपनीकडे आहे. ही संस्था अन्य ठेकेदाराकडून दुरुस्ती करुन घेत आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजता 35 वर्षीय कर्मचारी वसीम अहमद रा. लखीमपूर (फीटर), 28 वर्षीय शिवपाल रा. बलरामपूर (हेलपर), 30 वर्षी सोनू रा. बलरामपूर (वेल्डर) दुरुस्तीचे काम करत होते. वेल्डिंग करताना प्लॅटफॉर्म तुटला. प्लॅटफॉर्म पडल्याने तीनही कर्मचारी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर कारखान्यात गोंधळ माजला. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या वसीमला डॉक्टरने लखनउमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here