भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता, युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याचा या आशियाई देशांवर परिणाम

नवी दिल्ली : युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक बाजारावर दबाव वाढला आहे. सर्व देश आणि केंद्रीय बँका कोविड १९ महारमामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा स्थितीत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे महागाईचा दबाव आणखी वाढू शकतो. यासंदर्भात नोमुरा (Nomura)ने जाहीर केलेल्या अहवालानुसार आशियात भारताला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. नोमुराच्या अहवालाच्या आधारे इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गुरुवारी ट्रेड मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडचा दर १०५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचून त्यात जवळपास ३ टक्के वाढ झाली. रिसर्च फर्मच्या अहवालात अरोदीप नंदी आणि सोनल वर्मा यांनी म्हटले आहे की, इंधन आणि अन्नधान्याच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करतील. अशा स्थितीत भारत, थायलंड, फिलीपाईन्सवर सर्वाधिक वाईट परिणाम होईल. मात्र, या स्थितीचा इंडोनेशियाला फायदा मिळू शकतो. भारत हा तेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. क्रूड ऑईलच्या दरवाढीमुळे ग्राहक आणि व्यवसायासाठी निगेटिव्ह स्थिती निर्माण होऊ शकते. दरम्यान, भारताच्या केंद्रीय बँकेने आपल्या पतधोरण आढाव्यात व्याज दरात बदल केलेले नाहीत. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आरबीआय अशा प्रकारची कडक पावले उचलू शकेल अशी शक्यता यात वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here