विजेच्या संकटाचा चीनला झटका, अर्थव्यवस्थेची गती मंदावली

32

नवी दिल्ली : विजेचा तुटवडा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीचा फटका चीनला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीचा वेग ४.९ टक्क्यांवर आला आहे.

चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटॅस्टिक्सने सोमवारी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील आकडेवारी जारी केली आहे. चीनमध्ये जानेवारी महिन्यापासून आर्थिक वर्षाची सुरुवात कली जाते. त्यामुळे ही त्यांची तिसरी तिमाही आहे.

याबाबत रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, विजेची टंचाई आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोविड महामारीमुळे वस्तूंचा खप घटला आहे. त्यात ही भर पडली आहे.
यावर्षी एप्रील ते जून या तिमाहीत चीनच्या जीडीपी वाढीचा वेग ७.९ टक्के असा चांगला राहिला. त्याआधी गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ४.९ टक्के इतका होता. मात्र, तेव्हा कोरोनाचे संकट घोंघावत होते. यंदा पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या काळात जीडीपीत १८.३ टक्के अशी शानदार वाढ झाली.

कोरोनानंतर चीनने आपल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, आता पुन्हा ही अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी, विजेच्या टंचाईमुळे कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here