पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेली जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. भारत तुर्कीच्या नागरिकांच्या पाठीशी एकजुटीने उभा असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे.”
(Source: PIB)