दिल्लीतल्या विविध भागात उद्‌भवलेल्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

114

दिल्लीच्या विविध भागांमध्ये उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ‘दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी उद्‌भवलेल्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतला. पोलीस आणि अन्य संस्था या परिस्थितीवर घटनास्थळी काम करत असून शांतता राखण्याची आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची पराकाष्ठा करत आहेत.

शांती आणि सद्‌भाव ही आमच्या संस्कृतीची वैशिष्ठ्ये आहेत. माझ्या दिल्लीकर बंधुभगिनींनो, दिल्लीत शांती आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी मी आपणास आवाहन करतो. शांततामय परिस्थिती आणि दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येणे हे अतिशय महत्वाचे आहे’, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here