पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करायचीय, अशी आहे प्रक्रिया

नवी दिल्ली : असं म्हटलं जातं की कोणत्याही सरकारी विभागात काम होण्यास खूप वेळ आणि प्रयत्न करावे लागतात. अनेकजणांना वारंवार फेऱ्या घालूनही काम होत नाही. त्यामुळे आपल्याला निराश होऊन परतावे लागते. मात्र, जर तुमचे सरकारी काम अडले असे आणि खूप प्रयत्न करूनही होत नसेल अथवा केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तुम्हाला मिळत नसेल तर यामुळे अस्वस्थ होऊ नका. यासाठी आता तुम्ही वरिष्ठ अधिकारी अथवा केंद्र सरकारच्या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकता. तुम्ही पंतप्रधान कार्यालयाकडेही (पीएमओ) आपली ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://www.pmindia.gov.in/hi यावर क्लिक करावे लागेल. तिथे पंतप्रधानांना लिहा असा मेन्यू दिसेल. त्यावर क्लिक करा. तिथे CPGRAMS पेज ओपन होईल. तेथे तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तयार होईल. त्यावेळी तुम्हाला तुमच्या तक्रारींबाबतची कागदपत्रे अपलोड करावी लागतील. सर्व आवश्यक माहिती नोंदवल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.
ऑनलाईन प्रक्रियेबरोबरच ऑफलाईन माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार नोंदवली जाऊ शकते. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर टपालाने तक्रार पाठवावी लागेल. यासाठी पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली, ११००११ असा पत्ता आहे. याशिवाय फॅक्ससाठी ०११- २३०१६८५७ असा क्रमांक आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here