पंजाबचे मुख्यमंत्री यांनी सहकारमंत्र्यांना ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवण्यास सांगितले

91

चंदीगढ: पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी गुरुवारी सहकार मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांना निर्देश दिले की त्यांनी राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्याकडुन वर्ष 2019-20 हंगामासाठी ऊस शेतकर्‍यांची थकबाकी तात्काळ भागवावी. एका निवेदनात असे म्हटले आहे की, सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था शुगर फेड ने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गाळप हंगाम 2019-20 साठी साखर कारखान्यांना 100 करोड रुपये दिले आहेत.

मुख्यमंत्री रंधावा यांना कोणत्याही विलंबाशिवाय शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी कारखान्यांना निर्देश देण्यास सांगितले आहे. निवेदनात म्हटले आहे की, 100 करोड रुपये जारी करण्याबरोबरच सहकारी साखर कारखाने गाळप हंगाम 2019-20 साठी एकूण 486.23 करोड रुपये देयाच्या तुलनेत 349.05 करोड रुपये भागण्यामध्ये सक्षम होतील. नवांशहर, बुधेवाल, मोरिंडा, फाजिल्का, गुरदासपूर, अजनाला, नकोदर, भोगपूर आणि बटाला मध्ये असणार्‍या साखर कारखान्यांकडून 2018-19 च्या हंगामाचे देय यापूर्वीच दिले आहे.

रंधावा यांनी शेतकर्‍यांना वर्ष 2019-20 चे उर्वरीत पैसे लवकरात लवकर भागवण्याचे आश्‍वासान दिले आहे. रंधावा यांनी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून कोरोना वायरस महामारी आणि लॉकडाउन मुळे सरकारी महसुलामध्ये घट होवूनही,ऊस शेतकर्‍यांचे देय लवकरात लवकर भागवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here