यावर्षीच्या गळीत हंगामासाठी साखर कारखान्यांची दुरूस्तीला वेग

कोल्हापूर, दि. 1 स्पटेंबर 2018: यावर्षीचा ऊस गळीत हंगामा ऑक्‍टोबर महिन्याच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. यापार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची दुरूस्ती, साफसफाईचे कामे सुरू झाली आहेत. यावर्षीचा (2018-19) हंगाम जस-जसा जवळ येत आहे, तस तसा कारखान्यांच्या दुरूस्तीला वेग येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे खासगी आणि सहकारी असे एकूण 22 साखर कारखाने आहेत. गेल्यावर्षीचा गळीत हंगाम संपल्यानंतर सर्व यंत्रणा बंद ठेवावी लागते. तसेच, नव्याने सुरू करायची म्हंटली किंवा त्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होत असते. हंगाम सुरू होण्याआधी दोन महिने हे काम सुरू राहते. दरम्यान, यावर्षी पावसाळा लांबला आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस कोल्हापूरात झाला आहे. त्यामुळे हे काम लांबले होते. मात्र, काही दिवसापूर्वी सर्वच साखर कारखान्यांनी कारखान्यांची अंतर्गत आणि मशिनची कामे सुरू केली आहेत.

कारखान्यांच्या कामात इंजिनिअर, ज्यु. इंजिनिअरसह इतर कर्मचारी कामाला लागले आहे. दोन महिन्यात ही सर्व कामे संपवून कारखाना सुरू करावा लागणार आहे. ऐन हंगामात कोणतीही अडचण किंवा कारखाना बंद राहू नये याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी आताच कारखाना सुरू करून सर्व चाचण्या घ्याव्या लागतात. हंगाम सुरू असताना एखाद दिवस कारखाना बंद राहिला तर 7 हजार ते 10 हजार टन उसाचे गाळप ठप्प होते. याचा विचार करूनच ही सर्व कामे केली जात आहे

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here