गोदामांमधील शिल्लक ८३ हजार क्विंटल साखर खराब होण्याची शक्यता

वाराणसी : सठियाव किसान सहकारी साखर कारखान्याकडील २०१८-२९ आणि २०१९-२० या वर्षातील सुमारे ८३ हजार क्विंटल साखर आजमगढ आणि मऊ जिल्ह्यातील पाच गोडावूनमध्ये पडून आहे. या साखरेला कोणताही खरेदीदार मिळालेला नाही. गोदामांमधील साखरेच्या देखभालीसाठी साखर कारखान्याकडून दर महिनयाला तीन लाख रुपये भाडे दिले जाते. पडून असलेल्या या साखरेची किंमत ८५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. गोदामांमध्ये पडून असलेली ही साखर आता खराब होत आहे.

सठियाव साखर कारखान्याने गेल्या हंगामामध्ये ४५ लाख क्विंटन उसाचे क्रशिंग करून तीन लाख ८० हजार क्विंटल साखर उत्पादन केले. ही तयार झालेली साखर जिल्ह्यातील फखरुद्दीनपूर, हुसेनगंज, अतरौलीया, सठियाव आणि मऊ येथील भाड्याच्या गोदामांमध्ये ठेवण्यात आली. यासाठी दरमहा तीन लाख रुपये भाडे दिले जाते. साखरेची मागणी कमी असल्याने आणि या साखरेचा दर्जा कमी असल्याने त्याची विक्री झाली नाही.

याबाबत मुख्य लेखापाल वैष्णव तिवारी यांनी सांगितले की, उत्पादित साखरेत एम ३० (बारिक) या श्रेणीतील ३६ हजार क्विंटल साखर आहे. या साखरेचा उपयोग बिस्किट, कोल्ड्रिंक आणि ज्युससाठी केला जातो. कोरोना महामारीच्या फटक्याने यावर्षी बाजारपेठ बंद राहिली. यापर्वीची २०१८-१९ या हंगामातील ८३ हजार क्विंटल साखर कारखान्यात पडून आहे. जर या मालाचा उठाव झाला नाही तर भविष्यात यावर पुन्हा प्रोसेसिंग करावी लागेल. त्यामुळे खर्च वाढून उत्पादन ९० टक्क्यांवर येईल. कारखान्याला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने यावर विचार करण्याची गरज आहे. या प्रकाराची चौकशी करून त्यानंतरच योग्य कारवाई करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here