ब्राझील : हंगाम २०२२-२३ मध्ये ऊस गाळप, साखर उत्पादनाचा सुधारित अहवाल जारी

47

साओ पाउलो : ब्राझीलच्या मध्य-दक्षिण विभागात अनुकूल हवामान आणि कारखानदारांनी स्वीटनरच्या उत्पादनावर लक्ष केद्रीत केल्यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन होईल असे जॉब इकॉनॉमियाच्या सुधारित अहवालात म्हटले आहे. नव्या अनुमानानुसार २०२२-२३ मध्ये ब्राझीलच्या मुख्य साखर पट्ट्यातून ५६६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होईल. यापूर्वी एप्रिलमध्ये ५५८ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. सद्यस्थितीत साखरेचे उत्पादन ३३.५ दशलक्ष टनावरून ३४.८ दशलक्ष टनापर्यंत वाढले आहे.

अलिकडेच ब्राझीलमध्ये पडलेल्या पावसामुळे उसाची वाढ चांगली होण्याची शक्यता सुधारली आहे असे अहवालात म्हटले आहे. जॉब इकॉनॉमियाचे संचालक ज्युलिओ मारिया बोर्जेस म्हणाले की स्वीटरन उत्पादनाकडे कारखान्यांकडून अधिक लक्ष दिले गेले आहे. एप्रिलमधील अंदाजानुसार ४४.१ टक्क्यांच्या तुलनेत कारखाने ४६.१ टक्के ऊस गाळप करतील अशी शक्यता आहे. ब्राझीलमध्ये इंधनाच्या किमती घसरल्याने कारखाने इथेनॉलऐवजी साखरेचे उत्पादन करून नफा कमावतील असे त्यांनी सांगितले. जॉब इकॉनॉमियाच्या अहवालानुसार, ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादन २९.१ अब्ज लिटर इतके अपेक्षित आहे. यापूर्वी हे उत्पादन ३०.२ अब्ज लिटर होईल असे अनुमान वर्तविण्यात आले होते. तर साखर निर्यातीचा अंदाज २४.५ दशलक्ष टनावरून २५.६ दशलक्ष टनावर गेला आहे. ब्राझीलमधील ऊस पिकाच्या सुधारणेनंतर भारतात ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या किमती घसरल्या आहेत. सोमवारी आयसीई रॉ शुगर फ्युचरमधील किमती गेल्या सहा आठवड्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here