पुढील वर्षापासून रीगा साखर कारखाना सुरू होणार

115

सीतामढी : साखर कारखाना परिसरात मुख्य व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश धानुका यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत कारखाना पुढील वर्षापासून सुरू केला जाईल असे स्पष्ट केला आहे. यासोबतच कारखाना सुरू ठेवताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करत पुढील हंगामात कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी अनुदान दिले जाईल असेही आश्वासन दिले.

साखर कारखाना सुरू करण्यासाठी कार्यस्थळावर २६ डिसेंबर रोजी पूजाविधी करण्यात आला. मात्र, कामगार कामावर परतले नसल्याने कारखाना वेळेवर सुरू होऊ शकलेला नाही. डिस्टीलरी युनीट सुरू झाल्यानंतरच पुढील वर्षी कारखाना सुरू करण्यासाठी तयार असल्याचे धानुका यांनी सांगितले. जर कारखान्याकडून इथेनॉलचे उत्पादन सुरू झाले, तर साधारणतः ७ कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात. त्यातून कारखाना व्यवस्थापनाला कामगारांची थकीत देण्यांची पूर्तता करता येईल. यासोबतच पुढील हंगामात ऊस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाऊ शकते. सद्यस्थितीत केंद्र सरकारने कारखान्याला ६ कोटी रुपयांचे अनुदानदिले आहे. या पैशांमध्ये शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम दिली जाणार असल्याचेही धानुका यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here