ऊसावर किडींच्या हल्ल्याचा धोका वाढला

186

लखीमपूर : तोक्ते चक्रीवादळामुळे आधीच पाऊस झाल्याने तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. त्यामुळे उसावर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ऊस विभागाने या किडींपासून बचावासाठी निर्देश जारी केले आहेत. यासोबतच कृषी वैज्ञानिकांनी जाग्यावर जावून तपासणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

गेल्या वर्षी, २०२० मध्ये परदेशी टोळधाड ऊस पिकावर आली होती. मात्र, यावर्षा ग्रास हॉपर, लष्करी आळी, पायरेला अशा किटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी पिकांची तपासणी करावी, किटकांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याला आळा घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

ऊस आयुक्त संजय भूसरेड्डी यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात जाग्यावर जाऊन पाहणी करून किटकांची तपासणी करावी, संशोधकांच्या मदतीने किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना याबाबत वैज्ञानिक माहिती देण्यासह त्यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात पायरेला किडीचा प्रादुर्भाव दिसून आलेल्या ठिकाणी औषध फवारणीची सूचना ऊस संशोधन परिषदेने केली आहे. स्प्रे पंपाने इमिडाक्लोप्रिड १५०-२०० मिली अथवा प्रोफेनोफास ७५० मिली ही किटकनाशके सहाशे लीटर पाण्यात मिळून फवारावीत. याशिवाय इतर किडींसाठी इमिडाक्लोप्रिड अथवा क्वीनॉलफास, डाइक्लोरवास यांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आाहे. शेतांमध्ये जर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असेल तर अशी रोपे नष्ट करावीत. किडींच्या सुरुवातीच्या टप्प्यात कडुलिंबाच्या तेलाचा वापर करावा. या किडीचा प्रादुर्भाव असेल तर क्लोरपाइरोफास अथवा मोनोक्रोटोफास द्रावण फवारावे अशी सूचना जिल्हा ऊस अधिकारी ब्रजेश कुमार पटेल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here