डब्ल्यूटीओमध्ये ‘खास तसेच स्वतंत्र वर्तना’वर विकसित देशांची भूमिका अयोग्य: गोयल

नवी दिल्ली : गरीब तसेच विकसनशील देशांसोबत खास तसेच वेगळ्या वर्तनाबाबत जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) सुधारणांशी विकसित देशांनी जोडले जाणे अनुचित आहे असे मत वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केले.

गोयल यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, आज जगाने हेही पाहिले पाहिजे की, काही देश जागतिक व्यापाराच्या नियमांचे पारदर्शक तसेच निष्पक्ष पालन करीत आहेत. डब्ल्यूटीओने आपल्या कामकाजाची योग्य समिक्षा करण्याची गरज आहे. डब्ल्यूटीओकडून गरीब तसेच विकसनशील देशांना व्यापाराबाबत अनेक सवलती दिल्या जातात. याला खास तसेच भेदभाव करणारी वर्तणूक म्हटली जाते. त्यांच्याकडून व्यापाराच्या संधी मिळाव्यात यासाठी असे प्रयत्न केले जातात. सद्यस्थितीत कोणताही देश स्वतःला विकसनशील जाहीर करून या सवलती मिळवू शकतो.
मात्र अमेरिकेने यावर आक्षेप नोंदवत स्व-घोषणेमुळे डब्ल्यूटीओ अपयशाकडे वळत असल्याची टीका केली आहे. संघटनेच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

तर भारताने याबाबत डब्ल्यूटीओमध्ये सर्व सहमतीने निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली आहे. याबाबत गोयल म्हणाले, मला वाटते की डब्ल्यूटीओने आपल्या कामकाजाची समीक्षा करण्याची गरज आहे. विकसित देश सुधारणांची भाषा करतात. आणि त्याला खास वर्तणुकीचे लेबल लावतात. अशा स्थितीत विकसनशील देशांना थोडे फायदे मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here