1 जानेवारपासून बदलणार चेकच्या माध्यमातून केले जाणार्‍या पेमेंटचे नियम, आता अशी आहे नवी सिस्टीम

197

1 जानेवारपासून बदलणार चेकच्या माध्यमातून केले जाणार्‍या पेमेंटचे नियम, आता अशी आहे नवी सिस्टीम

चेकच्या माध्यमातून पैसे देणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता 1 जानेवारी 2021 पासून चेक ने पैसे देणार्‍या नियमांमध्ये परिवर्तन हाोणार आहे. आरबीआय ने बँक धोक़्यावर अंकुश घालण्यासाठी एक नवी सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या सिस्टीम चे नाव पॉजिटीव पे सिस्टीम ठेवण्यात आले आहे. आरबीआय च्या या नियमांतर्गत 50,000 रुपयापेक्षा अधिक रक्कम भागवताना आवश्यक सूचना कन्फर्म करण्याची आवश्यकता आहे. हा नवा नियम 1 जानेवारीपासून पूर्ण देशात लागू होईल.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये एमपीसीच्या बैठकीमध्ये याची घोषणा केली होती. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेवून पॉजिटिव पे चा नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा हेतु चेकचा दुरुपयोग रोखणे हा आहे. याबरोबरच, यामुळे नकली चेकच्या माध्यमातून होणारा धोकाही कमी होवू शकतो.

बँकिंंग फ्रॉड वर लगाम घालण्यासाठी 1 जानेवारी 2021 पासून लागू होणार्‍या आरबीआय च्या पॉजिटिव्ह पें सिस्टम अंतर्गत चेक च्या माध्यमातून 50,000 रुपये किंवा यापेक्षा अधिक पैसे भागवताना काही आवश्यक माहिती पुन्हा कन्फर्म करणे आवश्यक आहे. हे खातेधारकांवर निर्भर राहिल की, ते या सुविधेचा लाभ घेणार की नाही, पण ही शक्यता आहे की, चेकच्या माध्यमातून 5 लाख किंवा यापेक्षा अधिक पैसे देंण्यासाटी बँक या सुविधेला लागू करणार.

पॉजिटिव्ह पे सिस्टीम अंतर्गत चेक जारी करणार्‍या व्यक्तीला एसएमएस, मोबाइल अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉजिनक माध्यमातून चेकशी संबंधीत काही माहिती द्यावी लागेल. याअंतर्गत चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्ता आणि पेमंट ची रक्कम इत्यादीबाबत पूर्ण माहिती द्यावी लागेल.

चेक पेमेंट पूर्वी या माहितीला क्रॉस चेक केले जाईल. क्रॉस चेक च्या दरम्यान कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास चेक ट्रंकेशन सिस्टीम द्वारा याला मार्क करुन ड्रॉई बँक आणि प्रेजेटिग बँकेला माहिती दिली जाईल. आरबीआय ने सांगितले की, अशा स्थितीमध्ये आवश्यक पाउल उचलले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here