रुपयामध्ये किरकोळ घसरण, सुरुवातीच्या सत्रात १० पैशांनी घटून पोहोचला ७९.८९ वर

मुंबई : आज रुपया ७९.८२ वर खुला झाला. काल तो ७९.७९ या स्तरावर बंद झाला होता. कालच्या तुलनेत ३ पैशांची घसरण सुरुवातीला पाहायला मिळाली. या सत्रात रुपया ७९.८९ रुपये प्रती डॉलरच्या स्तरावर दिसून आला. यामध्ये आज सुरुवातीपासून ओपनिंग लेव्हलच्या तुलनेत ७ पैशांची घसरण दिसून आली. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने आक्रमक भूमिका घेत व्याज दरात जोरदार वाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रुपया घसरणीच्या टप्प्यात आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांनी बाजरातून पैसा काढून घेण्याचा सपाटा लावल्याने इंटरबँक परकीय चलन विनिमय बाजारातील रुपयाने फायदा गमावला आहे. तो डॉलरच्या तुलनेत आता घसरत आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, एचडीएफसी सिक्युरिटीजच्या रिसर्च अॅनालिस्ट दिलिप परमार यांनी सांगितले की, फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीआधी परकीय चलन बाजाराने वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे. त्याशिवाय, कमजोर देशांतर्गत शेअर बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतीचाही परिणाम रुपयावर झाला आहे. दुसरीकडे सहा प्रमुख चलनाच्या तुलनेत डॉलरची नोंद घेणारा डॉलर इंडेक्स ०.३१ टक्के वाढून १०६.८१ वर आला आहे. आंतरराष्ट्रीय ब्रेंट क्रूड वायदा आज १०५ डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here