‘सहकार शिरोमणी’च्या गळीत हंगामाचा शुभारंभ

सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ हणमंत काळे- वेदपाठक, लिंबाजी काटवटे, मधुकर पवार, अब्बासभाई शेख, अर्जुन पासले, धनंजय तळेकर या शेतकरी सभासदांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. संचालक परमेश्वर लामकाने व पद्मिणी लामकाने या उभयतांच्या हस्ते गव्हाण व काटापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन भारत कोळेकर होते. यावेळी कार्यकारी झुंजार आसबे म्हणाले, चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे.

आसबे म्हणाले, चालू हंगामात पहिली उचलही इतर कारखान्यांच्या बरोबरीने दिली जाईल. शेतकऱ्यांची मागील थकीत देणी देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. अधिकाधिक ऊस गाळपासाठी शेतकरी, तोडणी वाहतूकदार, अधिकारी, कामगारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संचालक मोहन नागटिळक, गोरख जाधव, अण्णा शिंदे, अॅड. तानाजी सरदार, राजाराम पाटील, दिनकर कदम, योगेश ताड, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, सुनिल सराटे, अरुण नलवडे, अमोल माने, युवराज दगडे, राजाभाऊ माने, सुरेश देठे, दाऊद शेख, नारायण शिंदे, कृष्णात माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी केले, तर आभार संचालक नागेश फाटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here