कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या नव्या संख्येत घट झाली आहे तर बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाची दुसरी लाट संपल्याचे मानले जात आहे. मात्र लोकांनी अधिक सावध राहावे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिला आहे. गेल्या दीड वर्षापासून आलेल्या अनुभवांतून आपण कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहिले पाहिजे असे आपण शिकलो आहोत अशी टिप्पणी त्यांनी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. दिल्लीत जरी रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आपण बेसावध राहू नये हा धडा गेल्या दीड वर्षात आपल्याला मिळाला आहे. आपल्याला सदैव सतर्क राहावे लागेल.

या कार्यक्रमाला दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल, दिलल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. यावेळी साथरोगांबाबतचा आढावा घेण्यात आला.

लसीकरणाला प्राधान्य देण्याची भूमिका मांडताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, सुदैवाने गेल्या सहा महिन्यांपासून लस उपलब्ध आहे. जास्तीत जास्त लोकांनी लस टोचून घ्यावी आणि कोरोना विरोधी लढाईत सहभाग द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here