दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेवर शुगर टॅक्सचे गंभीर परिणाम

केप टाउन : दक्षिण आफ्रिकेत २०१८ मध्ये लागू करण्यात आलेल्या साखरेवरील करांच्या सामाजिक-आर्थिक परिणामांचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यानुसार या कराचा विपरीत व्यापक परिणाम साखर उद्योगासह अर्थव्यवस्था आणि नोकऱ्यांवर पडला आहे. शुगर टॅक्स व्हा लागू झाला तेव्हा साखर उद्योग आधीपासूनच दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ आणि स्वस्त साथर आयातीसह प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत होता.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्यापार आणि उद्योगांच्या पोर्टफोलिओ समितीने केलेल्या सुचनांनुसार राष्ट्रीय आर्थिक विकास आणि श्रम परिषदेने (एनईडीएलएसी) सादर केलेल्या साखर उद्योगाच्या आरोग्यावर लेव्ही करांचा आर्थिक परिणाम या विषयावरील अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, २०१९ पर्यंत साखरेवरील करानुसार संपूर्ण अर्थव्यवस्थेचे एकूण १६,६२१ नोकऱ्यांचे नुकसान झाले. यासोबतच अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीत आर ६५३ मिलियनची घसरण झाली आहे. यासोबतच २०१९ मध्ये जीडीपीमध्ये साखर उद्योगाच्या सकल मूल्य वर्धित करात (जीव्हीए) आर १.१९ बिलियनची घसरण झाली आहे. साखरेवर कर लागू केल्यानंतर साखर उद्योगाला ९१५४ नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले. या उद्योगाशी निगडीत जवळपास १० टक्के नोकऱ्यांची घसरण झाल्याची नोंद अहवालात झाली आहेत.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here