चार कारखान्यांचा गाळप हंगाम २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार

बिजनौर : आगामी ऊस गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांची तयारी पूर्ण झाली आहे. दिवाळीनंतर २८ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील बुंदकी, बहादरपुर, धामपुर आणि बरकातपुर हे चार कारखाने आपल्या गाळपास सुरुवात करतील. त्यासाठी तोडणीची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील इतर कारखानेही लवकरात लवकर गाळप सुरू करणार आहेत.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बिजनौर जिल्हा हा ऊस पट्टा म्हणूनच ओळखला जातो. जिल्ह्यात जवळपास सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. हंगामात नऊ साखर कारखाने कार्यरत असतात. ग्रामीण अर्थव्यवस्था ऊस पिकावर अवलंबून आहे. शेतकरी संघटनांनी लवकरात लवकर साखर कारखाने सुरू करण्याची मागणी केली होती. सध्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचेही संकट आहे. आता कारखाने सुरू झाल्यावर हा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे. जिल्ह्यातील स्योहारा कारखाना २६ ऑक्टोबर तर बिलाई कारखाना २८ ऑक्टोबरला सुरू होईल. चांदपूर कारखाना दोन नोव्हेंबर, बिजनौर तीन नोव्हेंबर आणि नजीबाबाद कारखाना पाच नोव्हेंबरपासून गाळप सुरू करेल. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बुंदकी, बहादरपुर, धामपुर व बरकातपुर हे कारखाने २८ पासून सुरू होतील. इतर कारखानेही लवकरच गाळप सुरू करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here