बळीराजा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

परभणी : कान्हडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. फेब्रुवारीपर्यंत सर्व सभासदांचा ऊस गाळपास आणला जाईल. त्यानंतर कारखाना परिसरातील सर्व बिगर सभासदांचा ऊस आणला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची चिंता करु नये अशी ग्वाही कारखान्याच्यावतीने देण्यात आली. कारखान्याचा १० व्या गाळप हंगामाचा प्रारंभ संचालक दिनकरराव जाधव यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला.

कारखान्याने गेल्या हंगामात ५ लाख ७२ हजार २५३ टन ऊस गाळप करुन सरासरी ११.८० टक्के उताऱ्याने ६ लाख ७५ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले. शेतकऱ्यांना प्रती टन २७६४.७० रुपये एफआरपी दिली आहे. यावर्षी एफआरपी दर अंदाजे निश्चित चांगला राहील, असे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल प्रती टन २२०० रुपये देण्यात येईल. त्यानंतर आणखी दोन हप्ते दिले जातील असे सांगण्यात आले.

गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी मदनराव वाघ, बाबूराव बोबडे, मारोती बखाल, ॲड. एम. ए. सईद, ॲड. सुरेश सूर्यवंशी, कारखान्याचे सरव्यवस्थापक भगवानराव मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिष्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रिक मॅनेजर नितीन गणोरकर, अभियंता मदन देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कऱ्हाळे, रामजी शिंदे, विनायक कदम उपस्थित होते. माधवराव मोहीते यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश जोगदंड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here