ऊस बिले देण्यासाठी तामीळनाडूत राज्य सरकार करणार मदत

चेन्नई : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री एम. आर. के. पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडू सरकार राज्यातील सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील साखर कारखान्यांची १८२ कोटी रुपायांची ऊस बिले देणार असल्याची माहिती विधानसभेत दिली.

मंत्री पन्नीरसेव्वम म्हणाले, सरकारने प्रतिकात्मक कर्ज रुपात यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात दहा सहकारी आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. २०२०-२१ या हंगामात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लाभदायी आणि योग्य दरानुसार (एफआरपी) ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकार पैसे उपलब्ध करून देणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

ते म्हणाले, उसाची थकबाकी देण्यासाठी उपाययोजना केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला आपल्या उसाचा पुरवठा केला, त्यांचे पैसे देण्याची तरतूद सरकारने केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here