गेल्या तीन दिवसांत कोसळला शेअर बाजार, गुंतवणूकदार हवालदिल

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार घसरण सुरू आहे. महागाई आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या दरांमुळे निर्माण झालेल्या चिंतेनंतर बेंचमार्क इंडेक्समध्ये घसरणीची शक्यता आहे. बीएसई सेन्सेक्स ६०,००० च्या स्तरापेक्षा खाली असून निफ्टी ५० निर्देशांकही १७९०० च्या स्तरापेक्षा खाली घसरला आहे. दुपारी एक वाजता बीएसई ४४० अंकांनी घसरून ५९६५७ वर ट्रेड करीत होता. तर निफ्टी १२३ अंकांनी घसरुन १७,८१५ वर ट्रेड करीत होता.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये ब्रोकिंग अँड डिस्ट्रिब्युशनचे रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, अमेरिकन ट्रेझरी यील्ड जवळपाळ दोन वर्षाच्या उच्च स्तरावर पोहोचल्याने जागतिक बाजारात विक्रीचा दबाव आहे. जगभरात महागाईवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी कडक मॉनिटरींग पॉलिसी लागू केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. डिसेंबर महिन्यात ब्रिटनधमध्ये महागाई वाढून ५.४ टक्के झाली. मार्च १९९२ नंतर ही पहिल्यांदाच उच्च स्तरावर आहे. इराकहून तु्र्कस्तानला जाणारी पाईपलाईनवरील आऊटेज आणि राजकीय तणावामुळे तालाच्या किमती २०१४ नंतर उच्च स्तरावर आहेत. त्यातही महागाईची धास्ती असल्याने बाजारात समायोजन सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here