अचानक लागलेल्या आगीत तीन एकर ऊस जळाला

178

मुजफ्फर नगर : येथे एका शेतातील ऊसाला रविवारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे तीन एकरातील ऊस जळून खाक झाला. याबाबत संबंधित शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

छपार येथील शेतकरी सगवा छतरपाल त्याची यांचे गावाबाहेर शेत असून त्यामध्ये तीन एकरात ऊस लावण्यात आला होता. रविवारी दुपारी या उसाला अचानक आग लागली. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले. संबंधित शेतकऱ्याने अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here