एकरकमी एफआरपीच्या वादात साखर कारखान्याचे कार्यालय पेटले

सांगली :
उसाची एफआरपी टप्प्यात न मिळता एकरकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी संघटनेने साखर कारखान्यांना निवेदन दिले, आंदोलन केले. पण तरीही साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमी दिली नाही. याला उत्तर म्हणून संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळेत एफआरपी न दिल्याच्या निषेधार्थ क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील कार्यालय पेटवले.

मंगळवारी रात्री एफआरपी चा वाद चिघळल्याने हा प्रकार घडून आला. या आगीत कार्यालयातील कागदपत्रे आणि फर्निचर जळाले. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यानीं एकरकमी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात हा वाद अजून वाढण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीचा आग्रह बर्‍याच काळापासून धरला होता. तसे कारखान्यांनी कबूलही केले होते. पण हंगाम सुरु होवून अडीच तीन महिन झाले तरी थकबाकी शेतकर्‍यांना दिली गेली नाही. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतापले. आणि त्यामुळे आक्रमक बनलेल्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांच्या विरोंधात आंदोलन तिव्र केले आहे.

या आंदोलनाचे पर्यावसान म्हणून पलूस तालुक्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय पेटवण्यात झाले. पदवीधर निवडणुकीपूर्वी कारखान्याचे चेअरमन अरुण लाड यांनी एकरकमी एफआरपी द्यायचे कबूल करुनही, निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांनी शद्ब पाळला नाही. असा आरोप शेतकर्‍यांनी केला. त्याचबरोबर जिल्ह्यात बर्‍याच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शद्ब पाळलेला नाही, त्यामुळे कदाचित हे आंदोलन अधिक तिव्र होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here