साखर कारखाना आता 1 आणि 5 किलो पॅकेट मध्ये विकणार साखर

241

रोहतक : कोरोना मुळे साखर उद्योगावर माठा परिणाम झाला आहे. देशव्यापी लॉकडाउन मुळे घरगुती आणि जागतिक बाजारामध्ये साखर विक्री ठप्प झाली आहे. ज्याचा थेट परिणाम कारखान्यांच्या महसूलावर दिसून येत आहे. या आर्थिक संकटापासून सुटका करुन घेण्यासाठी साखर कारखाने उत्पन्नाच्या नव्या संधींचा विचार करीत आहेत.

रोहतक च्या भाली आनंदपूर साखर कारखान्याने आता 1 आणि 5 किलो च्या पॅकेटमध्ये साखर विकण्याची योजना बनवली आहे. कारखाना व्यवस्थापन द्वारा पॅकेट ची छपाई व अन्य प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या हे ट्रायल पद्धतीवर सुरु केले जाईल. जर याची मागणी वाढली तर याला मोठ्या स्तरावर देखील सुरु केले जावू शकते. रोहतक च्या साखर कारखान्याचे एमडी मानव मलिक यांनी सांगितले की, यासाठी प्रक्रिया सुरु आहे. महिन्याभरामध्ये हे उत्पादन बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

आइस्क्रीम, कोल्ड्रिंक आणि चॉकलेट सारख्या विविध प्रकारातील उत्पादनांच्या कन्फेशनरीज आणि निर्मार्त्यांच्या औद्योगिक वापरासाठीच्या मागणीत घट झाल्यामुळे साखरेची विक्री ठप्प आहे. याशिवाय साखरेच्या उप उत्पादनांची विक्री देखील मंद आहे. ज्यामुळे साखर कारखान्यांसमोर उत्पन्नाची समस्या निर्माण झाली आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेची विक्री लॉकडाउनमुळे एक मिलियन टन कमी होती. साखर विक्री न झाल्यामुळे साखर कारखान्यांसमोर ऊसाचे पैसे भागवण्याची देखील समस्या आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here