ऊस आयुक्तांकडून किच्छा साखर कारखान्याची अचानक पाहणी

रुद्रपूर : ऊस विकास तथा साखर उद्योगाचे आयुक्त हंसा दत्त पांडे यांनी किच्छा सहकारी ऊस विकास समितीची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कामकाजाचा आढावा घेतला. कारखान्यात अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश सहाय्यक ऊस आयुक्त कपिल मोहन यांना दिले. आयुक्तांनी समितीच्या सचिवांना सफाई आणि पाणी साठलेल्या जमिनीतील परिस्थिती सुधारण्याचे निर्देश यावेळी दिले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस आयुक्तांनी कार्यकारी संचालक त्रिलोक सिंह मर्तोलिया यांच्यासोबत साखर कारखान्याच्या प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. यासोबत आगामी गळीत हंगामासाठी टेंडरच्या माध्यमातून साखर कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थेत एकही वाहतूकदार तीनपेक्षा अधिक ऊस खरेदी केंद्रावर जाणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी कारखाना परिसरात वृक्षारोपणाचेही निर्देश दिले. गौराया टिश्यू कल्चर क्लबचीही पाहणी केली. ही रोपे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. आता नादेही कारखान्याची पाहणी केली जाईल असे सहाय्यक ऊस आयुक्त कपिल मोहन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here