गेल्या सात वर्षात इंधनात मिश्रणासाठी इथेनॉल पुरवठ्यात मोठी वाढ : पंतप्रधान मोदी

इंदौर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंदौरमध्ये आशियातील सर्वात मोठ्या बायो-सीएनजी प्लांटचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, पुढील दोन वर्षात देशातील ७५ मोठ्या शहरांमध्ये अशाच पद्धतीने बायो-सीएनजी प्लांट स्थापन केला जाईल. त्यासाठीचे काम सुरू आहे. या अभियानामुळे भारतातील शहरांना स्वच्छ, प्रदूषणमुक्त, स्वच्छ ऊर्जा निर्मितीस खूप मदत मिळेल.

पंतप्रधान मोदी म्हणाले, घरातून दररोज टाकला जाणारा ओला कचरा असो वा गावात जनावरे तसेच शेतांमधून जमा होणारा कचरा असो, ते स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त आहे. त्यापासून स्वच्छ इंधन आणि तेथून स्वच्छ इंधनापासून ऊर्जा अशी साखळी जगाला आकर्षित करते. देशभरातील शहरांमध्ये दशकभर लाखो टन कचरा हजारो एकर जमिनीवर पसरला आहे. वायू प्रदूषण आणि जल प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांचे ते एक मोठे कारण आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ही समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सात – आठ वर्षापूर्वी भारतात १-२ टक्के इथेनॉल मिश्रण केले जात होते. आज पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल आहे. गेल्या सात वर्षात इथेनॉलच्या पुरवठ्यात खूप वाढ झाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here