भारताच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार प्रतिबंधक जी-20 कार्यगटाच्या तिसऱ्या आणि अंतिम बैठकीचे कोलकाता येथे 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान आयोजन होणार आहे. जी-20 सदस्य, 10 निमंत्रित देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे 154 पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यानंतर 12 ऑगस्ट 2023 रोजी जी-20 भ्रष्टाचार प्रतिबंधक मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन होणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री जितेंद्र सिंह या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत.जी-20 भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यगटाची ही दुसरीच मंत्रिस्तरीय आणि प्रत्यक्ष उपस्थितीद्वारे होणारी भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यगटाची पहिली मंत्रिस्तरीय बैठक आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर भ्रष्टाचाराविरोधातील संघर्षाच्या नेतृत्वात भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यगट महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, या बैठकीत. मंत्र्यांच्या स्तरावर होणाऱ्या विचारविनिमयामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अधिक जास्त राजकीय पाठबळ मिळेल.
भारताच्या जी-20 अध्यक्षते अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक कार्यगटाला परदेशात फरार आर्थिक गुन्हेगारांविरोधातील कारवाई आणि मालमत्ता ताब्यात घेणे या संदर्भात उल्लेखनीय प्रगती करता आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात फरार आर्थिक गुन्हेगारांविरोधातील कारवाई आणि मालमत्ता जप्ती संदर्भात 2018 मध्ये जी-20 देशांसमोर सादर केलेल्या ऩऊ कलमी जाहीरनाम्याच्या आधारे त्यांना हे शक्य झाले आहे.
गुरुग्राम आणि ऋषीकेश येथे झालेल्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या एसीडब्लूजी बैठकांदरम्यान महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्यांवर तीन फलनिष्पत्ती दस्तावेज(उच्च स्तरीय सिद्धांत) अंतिम करून जी-20 मध्ये आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक जाहीरनामा पुढे नेण्याबाबत सर्वसहमती निर्माण करणे भारताला शक्य झाले होते.
(Source: PIB)