देशामध्ये कोरोना चे एकूण रुग्ण एक करोड़ पेक्षा अधिक, 95 लाख रुग्ण झाले बरे

107

नवी दिल्ली: देशामध्ये एका दिवसात कोरोनाचे 25 हजारापेक्षा अधिक रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये संक्रमणाच्या केस वाढून ही संख्या एक करोडच्या ही वर पोचली आहे. यापैकी 95 लाख 50 हजार पेक्षा अधिक लोक कोरोना मुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडयांनुसार, 347 अधिक लोकांच्या मृत्युनंतर मृतकांची संख्या वाढून 1,45,136 इतकी झाली आहे. तर देशामध्ये आता सक्रिय रुग्णसंख्या 3 लाख झाली आहे.

देशामध्ये सलग 12 दिवसांपासून रुग्णांची संख्या चार लाखापेक्षा कमी आहे. आता 3,08,751 रुग्णांवर उपचार सुरु आहे, जो एकूण 3.14 टक्के आहे. आकड्यांनुसार 95 लाख 50 हजार 712 लोक कोरोना मुक्त झाले असून देशामध्ये रुग्णांचा ठिक होण्याचा दर वाढून 95.46 टक्के झाला आहे. तर कोरोनामुळे मृत्यु दर 1.45 टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here