साखरेने भरलेला ट्रक रस्त्यातून गायब, वाहतूकदाराकडून फिर्याद दाखल

शाहजहांपूर : रोजा शुगर मिलमधून दीड लाख रुपयांची साखर घेऊन निघालेला एक ट्रक लखीमपूरच्या एका वाहतूकदाराच्या माध्यमातून जात होता. मात्र, ट्रक अद्याप संबंधीत ठिकाणी पोहोचला नाही. याबाबत वाहतूकदाराने ट्रक मालकावर साखर गायब केल्याचा आरोप करत रामचंद्र मिशन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
लखीमपूर खिरी येथील मेला मैदान येथील सुमित सिंह यांनी रामचंद्र मिशन पोलीस ठाण्यात फिर्यात नोंदवली आहेत. ते वाहतूकदार आहेत. त्यांना २७ सप्टेंबर रोजी फोन आला. फोनवरील व्यक्तीने त्याच्याकडे ट्रक असून ते माल वाहतूक भाड्याने करतात. सुमितने आपला वाहतूक एका कर्मचाऱ्यासोबत ३० सप्टेंबर रोजी रोजा साखर कारखान्यातून गाजीपूर येथे साखर घेऊन जाण्यासाठी ट्रकचे बुकिंग केले.

सुमित यांच्या म्हणण्यानुसार ट्रक चालकांनी रोजा साखर कारखान्यातून साखर ट्रकमध्ये भरली. मात्र, ट्रक गाजीपूरमध्ये पोहोचला नसल्याचे सांगण्यात येते. ट्रक कानपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथे पोहोचल्यावर ट्रक मालकाने साखर भरली नसल्याचे सांगितले. ज्या ट्रकमध्ये साखर भरली, त्याच्यावर खोटा नंबर लावण्यात आला होता. याबाबत सुमितने रामचंद्र मिशन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

पोलीस ठाण्याचे प्रमुख रजितराम यांनी सांगितले की हे प्रकरण लखीमपूर खिरी पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे प्रकरण तिकडे वर्ग केले जाईल. रोजा साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक मुनेश कुमार यांनी सांगितले की, रोजा साखर कारखान्याने साखर भरली होती. आता विक्रेता आणि वाहतूकदार यांची जबाबदारी आहे. रोजा साखर कारखान्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here