संतप्त शेतकर्‍यांचा ऊस बैठकीतून काढता पाय

103

सातारा : ऊसदराच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक़ आयोजित करण्यात आली होती. मात्र नियोजित वेळेत प्रशासनाचे प्रतिनिधी हजर न झाल्याने बळीराजा शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संतप्त झाले आणि संतप्त शेतकर्‍यांनी तेथून काढता पाय घेतला. शेतकर्‍यांनी नियोजन भवनाच्या दारातच निदर्शने करुन घोषणाबाजी केली. यावेळी काही शेतकर्‍यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून तातडीच्या आगमनाचा निरोप मिळाल्याने शेतकरी संघटना पुन्हा बैठकीस हजर झाल्या. प्रभारी जिल्हाधिकारी रामदास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी एफआरपी प्लस पाचशे रुपये दर देण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली. सातार्‍यात रिकव्हरीचा दर चांगला असताना एफआरपीचा दर का मिळत नाही, गतवर्षीची तब्बल 53 कोटी थकबाकी आहे, प्रशासन केवळ बैठकांचे आयोजन करते, ठोस अंमलबजावणी करत नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी केला.

अजिंक्यतारा, खटाव माण, ऍग्रो, जरंडेश्‍वर या कारखान्यांचे प्रतिनिधी बैठक़ीला उपस्थित नव्हते. यंदाच्या वर्षी एफआरपी प्लस पाचशे रुपये दर देण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली. प्रतापगड व किसनवीर साखर कारखान्याचे रिकव्हरी दर वेगवेगळे असल्याच्या मुद्द्यावर शेतकर्‍यांनी आक्षेप घेतला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here