जागतिक बँकेने दिला मंदीचा इशारा, ही कामे न झाल्यास परिस्थिती बिघडणार

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक मंदीचे संकट घोंघावत आहे. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटाने मंदीची शक्यता आणखी वाढवली आहे. जागतिक बँकेने आपल्या अहवालात याबाबतचा इशारा दिला आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेची गती २०३० पर्यंतच्या तीन दशकात सर्वात कमी राहू शकते. बँकेने अहवालात नमुद केले आहे की, उत्पादकता आणि कामगार पुरवठा याला प्रोत्साहन देणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासह सर्व्हिस सेक्टरच्या क्षमतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करणे गरजेचे आहे. कोविड १९ आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर पोटॅन्शिअल आऊटपुट ग्रोथ रेटचे व्हॅल्यूएशन करण्यात आले आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जागतिक बँकेने आपल्या अहवालात गेल्या तीन दशकातील वाढ आणि भरभराटीला प्रोत्साहन देणारे सर्व घटक कमकुवत झाले असल्याचे म्हटले आहे. या घसरणीमुळे २०२२-२२३० या काळात अॅव्हरेज ग्लोबल पोटेन्शिअल (जीडीपी) ग्रोथही घटण्याची शक्यता आहे. हा ट्रेंड फक्त विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांतच नव्हे तर विकसनशील देशांमधीलही वाढ कमी होईल असे दर्शवतो. या देशांची वार्षिक वाढ ४ टक्क्यांच्या आसपास राहील. जर जागतिक संकट आले तर परिस्थिती आणखी बिघडेल. आपण ज्या मंदीची चर्चा करीत आहोत, ती आणखी गतीमान होईल असे जागतिक बँकेला वाटते.

जागतिक बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ इंदरमीत गिल यांनी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे वाया गेलेले दशक ठरू शकते असे म्हटले आहे. अमेरिका तसेच युरोपमधील बँकिंग सिस्टीमने जगभरातील बाजारांना धोका निर्माण केला आहे. भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून येत आहे. बँकिंग स्टॉक्स दबावाखाली आहेत. अमेरिकेत दोन बँकांना कुलूप लागले आहे तर आणखी बँकांवरील संकट गडद झाल्याचे दिसून येत आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बुडाल्यानंतर अमेरिेकेतील बँकिंग संकटात आणखी काही बँका सापडतील. क्रेडिट सुईस बँक संकटात अडकून त्याची विक्री झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here