साखर कारखान्यातून दोन वीजपंपांसह टाकीची चोरी

घोसी : दी किसान सहकारी साखर कारखान्यामध्ये मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी साडेतीन अश्वशक्ती आणि साडेसात अश्वशक्तीचे दोन वीज पंप, अडीच इंच व्यासाची ७२ मिटर पाईप आणि ५१ रोलर्स चोरून नेले. साखर कारखान्याच्या सुरक्षा विभागाचे प्रभारी प्रमुख शिवमुनी यादव यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांकडे या चोरीबाबत पत्र दिले आहे.

याबाबत पत्रात म्हटले आहे की, साखर कारखान्याच्या बायो कंपोस्ट यार्डमध्ये लावलेल्या आसवनीपर्यंतची स्पेंटवॉशची अडीच इंच व्यासाची ७२ मिटर पाइपलाईन, दोन वीज पंप आणि पाचशे लिटर पाण्याचा टाकी, रोलर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.

चोरीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षक तेथे पोहोचले. त्यानंतर चोरांनी काही साहित्य तसेच तिचाकी गाडी तेथेच सोडून पलायन केले. कारखान्याचे प्रभारी निरीक्षक, उप जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांना याबाबत पत्र दिले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here