थकीत ऊस बिले मिळेपर्यंत कारखान्याला ऊस पुरवठा नाही

76

लखीमपूर खिरी : भारतीय शेतकरी संघटनेच्या बॅनरखाली आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र वर्मा यांच्या नेतृत्वाखाली बजाज हिंदूस्थान शुगर मिल खंबारखेडा येथे सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय किसान संघटनेचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र कुमार पंकज हे सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच आहेत, असे त्यांनी सांगितले. गेल्या दीड वर्षापासून शेतकरी ऊस बिले देण्याची मागणी करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत, तोपर्यंत कारखान्याला ऊस पाठविण्यात येणार नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवणे बंद केले आहे. उत्तर प्रदेशातील आणि भाजप सरकार शेतकऱ्यांची कोंडी करत आहे. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा असे या सरकारलावाटत नाही. भाजप सरकार धनदांडग्यांच्या हातात कठपुतळी बनले आहे. शेतकऱ्यांचे शोषण कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांची सर्व थकबाकी द्यावी. शेतकरी ऊस पुरवठा पूर्ववत करतील. यावेळी शैलेश शर्मा, प्रेम कुमार मिश्रा, अरविंद कुमार, कामिल खान, शकील खान, दिलीप कुमार निगम, करण जायसवाल, सौरभ वर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here