१५ ऑगस्टपर्यंत देशातील ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही

नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात पुढील पाच दिवसांपर्यंत कमी पावसाची शक्यता आहे. मात्र, काही राज्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली आहे. पूर्वोत्तर आणि पूर्व भारतासह उत्तर प्रदेशच्या उत्तर विभाग, बिहारमध्ये १४ ऑगस्टपर्यंत सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊ शकेल.

हवामान विभागाने दिलेल्याम माहितीनुसार, उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य भारत आणि महाराष्ट्र तथा गुजरातच्या बहुसंख्य भागात १५ ऑगस्टपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. तामीळनाडूमध्ये ११ ते १४ ऑगस्ट आणि केरळमध्ये ११ आणि १२ ऑगस्ट या कालावधीत काही ठिकाणी पाऊस पडेल.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार देशभरात मान्सून पुढील पाच दिवस आणखी कमकुवत स्थितीत राहील. पूर्वोत्तर आणि पूर्व भारत, उत्तर प्रदेशमध्ये चौदा ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडेल. नंतर तो कमी होऊ शकतो. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये चौदा ऑगस्पर्यंत चांगल्या पावसाची, काही ठिकाणी जोरदार पावसाची आणि बिहारमध्ये दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार देशात एक जूनपासून दहा ऑगस्टपर्यंत पाच टक्के कमी पाऊस झाला आहे. पश्चिम हिमाचल प्रदेशात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होईल. गुजरातमध्ये सामान्यपेक्षा ४५ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जलस्तर घटला आहे. राज्यातील २०० बंधारे, जलाशयांमध्ये एकूण क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा आहे. राज्य सरकारने पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाच लाख हेक्टर जमिनीला धरणांतून पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशाच चांगला पाऊस होईल. प्रयागराज, चित्रकुट, प्रतापगड, कौशाम्बी, बस्ती, रायबरेली, श्रावस्ती, बलिया, लखनौ आणि सुल्तानपूरमद्ये चांगल्या पावसाची नोंद झाली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here