जॉर्जटाउन : देशात कोणत्याही प्रकारे साखरेचा तुटवडा नसल्याचा दावा गयाना शुगर कॉर्पोरेशनने (GuySoCo) केला आहे. याबाबत GuySoCo ने म्हटले आहे की, २१ जुलै रोजी न्यू गयाना मार्केटिंग कॉर्पोरेशनकडून ग्राहकांना थेट $ १५० प्रती पाउंड खुली साखर आणि $ १४० प्रती पाउंड या दराने पॅकिंग केलेल्या साखरेची विक्री करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांचा नफेखोरी करण्याचा प्रयत्न रोखण्याची उपाययोजना करण्यात आली आहे.
देशात काही व्यापारी नफा कमविण्याच्या हेतूने साखरेची अपुरा पुरवठा असल्या दावा करीत आहेत, असे गयाना शुगर कॉर्पोरेशनने म्हटले आहे.