संजीवनी साखर कारखान्याबाबद राज्य सरकारच्या निर्णयामध्ये नवे काही नाही: सरदेसाई

132

मारगाओ, गोवा: गोवा फॉरवर्ड पार्टी चे अध्यक्ष सरदेसाई यांनी संजीवनी साखर कारखान्याला सहकार विभागाच्या नियंत्रणातून कृषी विभागाला स्थानांतरित करण्याच्या कॅबिनेट च्या निर्णयाला नव्या बाटलीत जुनीच दारु अश्या शब्दात संभोधले आहे. त्यांनी दावा केला की, सरकारकडून कॅबिनेट च्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये कोणतीही नवी गोष्ट नाही. त्यांचे म्हणणे आहे की, कारखान्यावरील नियंत्रणासाठी सहकार मंत्री गोविंद गौड आणि कृषी मंत्री चंद्रकांत कावलेकर यांच्या दरम्यान सुरु असणार्‍या ओढाताणीमुळे कॅबिनेट च्या निर्णयाला लागू करण्यात विलंब झाला.

सरदेसाई यांनी सांगितले की, जेव्हा मी कृषी मंत्री होतो, तेव्हा हा निर्णय 18 फेब्रुवारी, 2019 ला झालेल्या कॅबिनेटच्या बैठकी दरम्यान घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यतेखाली त्यांच्या निवासस्थानी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या घोषणेवर आनंद व्यक्त करताना सरदेसाई यांनी या निर्णयाबरोबरच पुढे जाण्यामध्ये 19 महिन्यांच्या विलंबावर प्रश्‍न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत तेव्हा कॅबिनेटमध्ये नव्हते, पण त्या बैठकीमध्ये घेतल्या गेलेल्या निर्णयाने अनभिज्ञ होण्यासाठी हे एक निमित्त होवू शकत नाही. आम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या फायद्यांचा लाभ घेण्याचा मानस ठेवला होता.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here