शेतांमध्ये अद्याप साडेतीन लाख क्विंटल ऊस शिल्लक

गोहाना: आहुलाना येथील चौधरी देवीलाल सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतात अद्याप शिल्लक असलेल्या ऊसाचा सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेनुसार शेतांमध्ये अद्याप साडेतीन लाख क्विंटल ऊस शिल्लक आहे. ऊन्हाचा कडाका वाढल्याने आणि कामगारांचा तुटवडा असल्याने तोडणी आणि वाहतूकीमध्ये शेतकऱ्यांना अडथळे येत आहेत. तर शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस मिळाल्यानंतरच कारखाना बंद केला जाईल असे यावेळी कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले.

ऊस विभागाचे व्यवस्थापक मनजीत सिंह दहिया यांनी सांगितले की आहुलाना येथील चौधरी देविलाल सहकारी साखर कारखान्याला परिसराताली १११ गावांतील शेतकरी ऊस पुरवठा करतात. प्रशासनाने गावातील वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व्हे केला आहे. बुधवार अखेर झालेल्या सर्व्हेतून येथे अद्याप साडेती लाख क्विंटल ऊस शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. कारखाना प्रशासनाने २०२०-२१ या गळीत हंगामासाठी सर्व्हे करून शेतकऱ्यांशी सुमारे ४७ लाख क्विंटल उसाचा बाँड केला होता. कारखाना प्रशासनाने आतापर्यंत, बुधवारअखेर ३८ लाख ५० हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे.

कडक उन्हाळा, कामगारांच्या तुटवड्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसाची तोडणी आणि वाहतुकीसाठी इतर राज्यांतून कामगार येतात. मात्र उन्हाळ्यामुळे कामगार परत चालले आहेत. अशाच शेतकऱ्यांना ऊस तोडणीमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना जादा पैसे मोजून ऊस तोडणी करून घ्यावी लागत आहे.

दरम्यान, विभागातील शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस घेतला जाईल. अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. भागात अद्याप साडेतीन लाख क्विंटल ऊस शिल्लक आहे अशी माहिती चौधरी देवीलाल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आशिष वशिष्ठ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here