कोरोनाच्या दैनिक रुग्णांमध्ये आली किरकोळ घट, 24 तासात समोर आले 23068 नवे रुग्ण

नवी दिल्ली: कोरोनाच्या दैनिक रुग्णांमध्ये सलग चढ उतार सुरु आहे. गुरुवारच्या तुलनेमध्ये शुक्रवारी दैनिक रुग्णांमध्ये किरकोळ घट नोंद करण्यात आली. गुरुवारी जिथे 24,712 रुग्णांना कारोना झाला होता, तिथे शुक्रवारी 23,068 रुग्ण कोविड 19 मुळे संक्रमित झाले.

देशामद्ये कोरोना संक्रमितांची संख्या एक करोडपेक्षा अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोविड 19 चे 23,068 रुग्ण समोर आले आहेत. याप्रमाणे देशामध्ये संक्रमितांची संख्या वाढून 1,01,46,846 झाली आहे. दरम्यान, 336 लोकांचा यामुळे मृत्यु झाला आहे. ज्यानंतर कोरोना मुळे मृत पावलेल्याची संख्या वाढून 1,47,092 झाली आहे.

मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशामद्ये कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढून 97 लाख पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तसात 24,661 रुग्णांनी कोरोनावर मात दिली आहे.

आकड्यांनुसार देशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखापेक्षा कमी आहे, यामध्ये सलग घट नोंदवली जात आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 2,81,919 झाली आहे. कोरोनाचे सक्रिय रुग्ण आणि कोरोनामुक्त रुग्णांच्यातील अंतर खूप जास्त आहे. ज्यामुळे हे समजते की, देशामध्ये कोरोनाविरोधातील लढाई योग्य दिशेने सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here