मजुरांसाठी होणार संघर्ष

गौरीबाजार: गौरीबाजार या बंद असणार्‍या साखर कारखाना गेटवर कारखाना कर्मचारी तसेच ऊस उत्पादकांची माजी आमदार दीनानाथ कुशवाहा यांनी बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, पाच महिन्यापासून जिल्हा प्रशासन आमच्या पक्षाच्या मागण्यांवर अंमलबजावणी करु शकलेले नाही. आता अम्हाला संघर्षाशिवाय पर्याय नाही. शासनामधील मोठया अधिकार्‍यांकडून आता कोणतीही आपेक्षा केली जावू शकत नाही. मजूर नेता ऋषिकेश यादव म्हणाले की, आज आमच्या आरसी जारी होवून पाच महिने झाले, पण जिल्हा प्रशासनातील लोक उद्योगपतींच्या दबावाखाली काम करत आहेत. आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. गणेश लाल श्रीवास्तव यांनी सांगितले की, आम्ही 15 दिवस वाट पाहू, अन्यथा आम्हाला नाइलाजाने तहसीलला घेराव घालावा लागणार. मजूर आणि शेतकर्‍यांची लढाई लढली जाईल. यावेळी रामवृक्ष, शहाबुद्दीन, अदालत अली, बलभद्र पांडे, हंसराज, रामाज्ञा यादव, डॉ. संजय कुमार शर्मा, नजमा खातून, चंपा देवी, केशिया, कौशल किशोर सिंह आदींनी मनोगत व्यक्त केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here