लखीमपूर :चालत्या ट्रकवर चढून चोरट्यांनी सहा पोती साखर खाली पाडली आणि तीन पोती घेवून ते फरार झाले. चालकाला ट्रकवर कुणीतरी चढतय याची जाणिव झाल्यानंतर त्याने गाडी थांबवून चोरट्यांचा शोध घेईपर्यंत चोरटे पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी झाडा झुडपांमध्ये अडकलेली साखरेची तीन पोती जप्त केली.
भीरा कस्बा येथील रहिवासी ट्रक चालक नरपाल सिंह मंगळवारी रात्री जवळपास नऊ वाजता पलिया साखर कारखान्यातून ट्रकमधून साखर लोड करुन सीतापूरला घेवून जात होता. रस्त्यात पलिया भीरा हायवे वर रपटा पुलाच्या जवळ रस्ता खराब असल्याने त्यांनी ट्रकची गती कमी केली. त्याचवेळी मागून बाईकवरुन येणार्या चोरट्यांनी बाइक ट्रकला लावून ट्रकवर चढले. आणि ताडपत्री कापून साखरेची सहा पोती जमिनीवर पाडली. दरम्यान पलिया कडून बाईक वरुन येणार्या भीरा खीरी येथील एका नागरीकाने ट्रक चालकाला ही माहिती दिली. त्यवेळी ट्रक चालकाने ट्रक थांबवून तात्काळ शोधमोहिम सुरु केली. ट्रकमधील साखरेच्या पोत्यांची अवस्था पाहून तो चांगलाच भानावर आला. त्याने तात्काळ या प्रकरणाची माहिती आपल्या लोकांना देण्याबरोबरच पोलिसांनाही सांगितली.गडबडीने मध्ये पोचलेल्या पोलिस टीम ने रपटा पूलाच्या जवळील झाड्ीमध्ये शोधले तेव्हा त्यांना साखरेची तीन पोती आढळून आली. तर तीन पोतीघेवून जाण्यात चोरटे सफल झाले. ट्रक चालकाने सांगितले की, या ठिकाणी यापूर्वीही चोरट्यांनी एका दुसर्या ट्रकमधून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. साखर लुटून नेल्याची तक्रार चालकाने पोलिसांना दिली आहे. याबाबत प्रभारीनिरीक्षक अजय राय यांनी सांगतिले की, घटनेची माहिती मिळाली. या प्रकरणाच्या तपासणी बराबेरच चोर तसेच साखरेचा तपास करण्यासाठी पोलिस टीमला सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.