ट्रकचा अपघात, साखरेच्या पोत्यांची चोरी

141

बेळगाव : साखरेच्या पोत्यांनी भरलेला एक ट्रक सोमवारी महाराष्ट्र राज्यातील राजगोळहून कर्नाटकात बेळगावच्या दिशेने येत होता. रात्री 9 च्या सुमारास शिवापूर ते सुतगट्टी या दरम्यान ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. यामुळे ट्रक अनियंत्रित होवून ट्रकचा अपघात झाला. याविरोधात पोलिसात केस दाखल करण्यात आली आहे.

साखरेची पोती भरलेला ट्रक बेळगावच्या दिशेने येत असताना शिवापूर सुटगट्टीजववळ पोचल्यानंतर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला. यावेळी चालकाला कसलीही मदत मिळाली नाही. उलट चोरट्यांनी वाहनातील साखर लांबवली. डोक्यावर, पाठीवर, दुचाकी अणि चारचाकीमधून ही पोती चोरुन नेण्यात आली.

परिसरातील ग्रमस्थांसह मार्गावरुन ये जा करणार्‍यांनी साखरेची पोती चोरल्याची तक्रार काकती पोलिस ठाण्यात दिली. यावेळी पोलिस निरिक्षक श्रीशैल कौजलगी यांनी अपघात झालेल्या स्थळी भेट देवून त्या परिसराचा पंचनामा केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here